महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून काढण्यात आलेल्या परीपत्रकाच्या संदर्भानुसार थोडक्यात मुद्दे व झालेले निर्णय मांडत आहे...
१. प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्यात आली असुन Sessional Marks + Progressive Assessment + Microproject + Class Test च्या गुणांवर व मागील सत्रातील ऍव्हरेज गुणांनुसार मार्क्स दिले जातील व त्याचा निकाल १५ जुलै पर्यंत लावण्यात येईल.
विद्यार्थ्यांना सबमिशन ३० जुन पर्यंत करता येईल.
२. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्राची परीक्षा राज्य स्तरावर ९ जुलै पासुन व निकाल ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात लागेल. व ज्या विद्यार्थ्यांचा निकाल WFLS/WFLY आहे अश्या विद्यार्थ्यांची परीक्षा संस्था स्तरावर १ ते ८ जुलै या कालावधीत घेण्यात येईल.
त्याच बरोबर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची प्रॅक्टीकल व ओरल परीक्षा ही स्थानिक परीस्थिती बघून जुनचा शेवटचा आठवडा ते जुलै पहील्या आठवड्यात प्राध्यान्याने ऑनलाईन स्काईप वर घेण्यात येईल.
३. जे विद्यार्थी सद्य स्थिती मध्ये RG 4C नुसार Fail/LSP परीक्षा देणार होते अश्या विद्यार्थांना तुर्त पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. पण त्यांची बॅकलॉग परीक्षा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पास होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा संस्था स्तरावर होईल.
४. ज्या विद्यार्थांना अजुनही परीक्षा फॉर्म भरावायचा आहे त्यांना विशेष सोय म्हणून जुनच्या दुसर्या आठवड्यात संधी देण्यात येईल.
५. महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी याच फेसबुक पेज वर अधिकृत सुचना देण्यात येईल तो पर्यंत विद्यार्थ्यांनी घरीच रहावे.
६. पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात-
द्वितीय व तृतीय वर्ष - १ ऑगस्ट पासुन
दहावी नंतरच्या विद्यार्थांसाठी प्रथम वर्ष - १ सप्टेंबर पासुन
तरीही विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास हेल्पलाईन नंबर म्हणून प्राचार्यांचा नंबर देण्यात येत आहे👉
- प्रा. हिंदुराव गोरे
प्राचार्य - एस व्ही आय टी पॉलिटेक्निक, सोलापूर
७७७४०२४९६७/९२७२६७९७९७